Important Read
FY २०१९ - २० चे आयकर विवरणपत्र भरण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी :-
( ०१-०४-२०१९ - ३१-०३-२०२० )
►►►► चालू वर्षाचे रिटर्न भरण्याकरिता :- (FY २०१९ -२० )
१) चालू वर्षाचे सर्व बँक खाती पासबुक किंवा बँक स्टेटमेंट्स - सेविंग खाते , करंट खाते ,
C.C. लोन खाते.
२) सरकारी बँक / कॉ-ऑप सोसायटी / कॉ-ऑप बँक चे कर्ज खाते स्टेटमेंट.
३) F.D. / R.D / स्मॉल सेविंग्स स्कीम च्या डिटेल्स आणि झेरॉक्स.
४) चालू वर्षचा उत्पन्नाचा तपशील ( पगार, व्यवसाय, शेती, भाडे उत्पन्न, मिळालेले व्याज इत्यादी) खरेदी- विक्री डिटेल्स , फॉर्म नं. १६, TDS सर्टिफिकेट इ.
५) मित्र किंवा कुटुंबियांना कडून घेतलेले कर्ज च्या डिटेल्स.
६) चालू वर्षात खरेदी किंवा विक्री केलेले प्रॉपटी / दुचाकी किंवा चारचाकी गाडी डिटेल्स, सोने- चांदी आभूषण ची माहिती.
७) इतर गुंतवणूक जसे - शेअर्स, म्युच्युअल फंडस्, PPF, बॉण्ड्स च्या डिटेल्स.
८) LIC पॉलिसी, mediclaim पॉलिसी, मुलांची शाळेची (चालू वर्षात ) फी भरल्याची पावती , NSC , पोस्ट ऑफिस मधील ठेव इत्यादीची डिटेल्स .
►►►► नवीन फाईल बनवण्या करिता :-
१) PAN कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, रेशन कार्ड, शॉप ऍक्ट लायसन्स ची झेरॉक्स.
२) मागील २ वर्षाची बॅलन्स शीट / प्रॉफिट अँड लॉस अकाउंट / टॅक्स चलन / IT रिटर्न ची कॉपी.
३) तुमच्या नावे असलेले प्रॉपटी च्या डिटेल्स - फ्लॅट, बंगलो, रो -हाऊस, दुकान, शेतजमीन, प्लॉट - खरेदी खत, दुचाकी किंवा चारचाकी गाडी किंवा इतर कोणतीही गाडी - खरेदी किंमत इ.
४) मागील वर्षाची मुदत ठेव / R.D / स्मॉल सेविंग्स स्कीम च्या डिटेल्स आणि झेरॉक्स.
Comments