top of page
Search

शेअर बाजार शिकण्यासाठी काय करावं?

शेयर बाजाराची माहिती आणि तिथे कश्या प्रकारे कार्यरत राहावे हे जाणून घेणे करता सर्वात अगोदर तुम्ही एखादा क्लास लावावा आणि त्याचबरोबर शेयर मार्केट शी निगडित सेमिनार अटेंड करावे.


शेयर मार्केट चा अभ्यास करण्यासाठी क्लास आणि सेमिनार हे दोघ पर्याय उपयोगी ठरू शकतात . तुम्ही कोणता क्लास लावला आणि कोणाचे आयोजित सेमिनार अटेंड केले त्यावर खूप काही अवलंबून आहे. काहीही शिकलेले आणि कोणाकडून हि शिकलेले कधी वाया जात नाही. परंतु त्यामधून मिळालेले ज्ञान तुम्ही कुठे आणि कसे अमलात आणता त्यावर बरेच काही निर्भर करते.


महत्वाचा मुद्दा आणि मार्ग म्हणजे स्वतः थोडी रक्कम गुंतवणूक करून आणि शेयर मार्केट मध्ये स्वतः हुन ट्रेडिंग करून मिळालेले अनुभव आणि ज्ञान हे तुम्हाला खूप काही शिकवून जाईल .

कारण ज्या प्रकारे पाण्यात उतरल्या शिवाय पोहायला जमत नाही त्याप्रकारे स्वतः हुन शेयर मार्केट चे प्रत्यक्ष अनुभव घेतल्या शिवाय शेयर मार्केट कळणे अवघड आहे . परंतु हे करत असतांना गुंतवणूक करायची रक्कम आणि ठरवलेले नफा नुकसानीचे लिमिट सोडता कामा नाही.

उदा . तुम्ही या साठी २५००० रुपये वेगळे काढून ठेवले ( म्हणजे तुमची लॉस बेअरिंग कॅपॅसिटी २५०००/- आहे ) आणि नफा तोटा ची लिमिट तुम्ही १५ % ठरवून गुंतवणूक केली तर , तुमची मूळ गुंतवणूक २५००० पेक्षा जास्त जात कामा नये आणि एखाद्या शेयर मध्ये ठरवलेल्या लिमिट एवढा नफा किंवा तोटा झाला की त्वरित त्यातून बाहेर पडावे.



शेयर मार्केट मध्ये एक तत्व खूप महत्वाचे आहे - एखाद्या शेयर वर प्रेम करा पण त्याच्याशी लग्न करू नका . अर्थात - तुमची ठरलेली लिमिट आली ( नफा किंवा तोटा) की त्यातून बाहेर पडा , त्याच्यात गुंतून राहू नका.

पण वरील तत्व हे शॉर्ट टर्म ( एक-दोन वर्ष पर्यंत ) कामात येते, लॉंग टर्म गुंतवणूक साठी कामाचे नाही. तुम्ही अभ्यास करून एखाद्या शेयर मध्ये २०-२५ वर्ष पर्यंत पण गुंतवणूक करणे हे उपयुक्त आहे. त्या मध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ( चक्रवाढीचा फायदा ) ची जादू अनुभवायला मिळते.


कोणत्याही गोष्टीचा फायदा होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धीर . शेयर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी धीर ठेवणे या पेक्षा जास्त चांगला, सोपा आणि खात्रीचा मार्ग दुसरा नाही .

शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे आधी तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट्य आणि ते आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ यांची सांगड घालणे अतिशय महत्वाचे आहे .


चला तर मग बघूया कि शेयर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होणेसाठी काय स्टेप्स घ्याव्यात :-

१) तुमच्या मासिक उत्पन्न आणि जीवनावश्यक घरघुती खर्च यांची सांगड घालणे .

२) उरलेल्या पैशातून अगोदर गुंतवणुकीस पैसे वेगळे काढणे आणि गुंतवणूक करणे . आणि पैसे उरल्यास इतर खर्च करणे . अनावश्यक खर्च कपात करणे.

३) आर्थिक उद्दिष्ट्य ठरवणे आणि त्या साठी किती वेळ द्यायची तुमची तयारी आहे हे ठरवणे .

४) गुंतवणूक ची साधने आणि त्याच्या संदर्भातील मूलभूत बाबींची तोंड ओळख करून देणे .

५) गुंतवणूक च्या प्रत्येक साधनांचे फायदे आणि तोटे समजून घेणे

६) आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या आर्थिक घडामोडींचा मागोवा घेणे

७) त्या आर्थिक घडामोडींचा आपल्या गुंतवणुकीवर होणार परिणाम समजून घेणे

८) आपण केलेल्या गुंतवणुकीवर आणि भविष्यातील करणाऱ्या गुंतवणुकीवर ठाम राहणे आणि त्यात नियमित असणे. शिस्तबद्ध गुंतवणूक .

९) मुदतीच्या आधी ही गुंतवणूक काढण्याची वेळ पडल्यास , जास्तीत जास्त गुंतवणूक कशी वाचवता येईल हे बघणे

4 views0 comments

Comments


bottom of page