top of page
Search

शेअर बाजारात सुरुवात कशी करावी?

पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही.

शेयर मार्केट हे एक मायाजाल आहे. शेयर मार्केट ने भल्या भल्या लोकांना पाणी पाजले आहे. मग नवख्या माणसाने सरळ शेयर मार्केट मध्ये उडी मारणे म्हणजे बकरीने सिंहाला त्याच्याच गुहेत जाऊन , त्याला गोड़ साखरझोपेतून उठवून त्याला डिचवण्यासारखे आहे. मग तो सिंह काय सोडतो का तिला ?? उभा आडवा त्या बकरीचा फडशा पाडल्याशिवाय त्याला चैन नाही.


शेयर मार्केट चे भीष्म पितामह समजले जाणारे साक्षात वॉरेन बफेट यांना या वर्षी पहिल्या तिमाहीत ( 01 JAN 2020 to 31 March 2020) एकूण $५० Billion ( INR ३७,४०१ कोटी फक्त ) चे नुकसान सहन करावे लागले आहे.



तर अश्या या शेयर मार्केट चा नाद म्हणजे दारूच्या व्यसनापेक्षा भयंकर आहे. याने अनेकांचे आयुष्य बरबाद केले आहे . पण जशी दारू काही विशिष्ट प्रमाणात सेवन केली तर औषधाचे काम करते , तसेच जर शेयर मार्केट चे काही नियम काटेकोरपणे पाळले तर तुम्ही शेयर मार्केट मध्ये तग धरू शकाल .


त्यामुळे शेयर मार्केट मध्ये डायरेक्ट ट्रेडिंग च्या फंद्यात पडण्याआधी - शेयर मार्केट समजून घ्या. त्याचा अभ्यास करा. शेयर मार्केट ची कार्यप्रणाली समजून घ्या - मार्केट ची मानसिकता समजून घ्या. या चौफेर उधळणार्या अश्वावर सरळ चढाई करणे अवघड आहे. तो कधी खालील पाडेल आणि खुराने तुडवेल याचा नेम नाही. काही दिवसातच आपण स्वतः किती पाण्यात आहोत हे कळेल. आपला रिस्क अँड लॉस appetite किती आहे ते कळेल.


शेयर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी धीर ठेवणे या पेक्षा जास्त चांगला, सोपा आणि खात्रीचा मार्ग दुसरा नाही .शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे आधी तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट्य आणि ते आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ यांची सांगड घालणे अतिशय महत्वाचे आहे .


शेयर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होणेसाठी काही स्टेप्स :-

१) तुमच्या मासिक उत्पन्न आणि जीवनावश्यक घरघुती खर्च यांची सांगड घालणे .

२) उरलेल्या पैशातून अगोदर गुंतवणुकीस पैसे वेगळे काढणे आणि गुंतवणूक करणे . आणि पैसे उरल्यास इतर खर्च करणे . अनावश्यक खर्च कपात करणे.

३) आर्थिक उद्दिष्ट्य ठरवणे आणि त्या साठी किती वेळ द्यायची तुमची तयारी आहे हे ठरवणे .

४) गुंतवणूक ची साधने आणि त्याच्या संदर्भातील मूलभूत बाबींची तोंड ओळख करून देणे .

५) गुंतवणूक च्या प्रत्येक साधनांचे फायदे आणि तोटे समजून घेणे

६) आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या आर्थिक घडामोडींचा मागोवा घेणे

७) त्या आर्थिक घडामोडींचा आपल्या गुंतवणुकीवर होणार परिणाम समजून घेणे

८) आपण केलेल्या गुंतवणुकीवर आणि भविष्यातील करणाऱ्या गुंतवणुकीवर ठाम राहणे आणि त्यात नियमित असणे. शिस्तबद्ध गुंतवणूक .

९) मुदतीच्या आधी ही गुंतवणूक काढण्याची वेळ पडल्यास , जास्तीत जास्त गुंतवणूक कशी वाचवता येईल हे बघणे

 
 
 

Comentários


Email: caagrawal.nsk@gmail.com
Phone: 0253-2573833

Mobile : +91 86000 75959

             : +91 98819 28702

3, Urvashi Apt, Shreerang Nagar, Vidya Vikas Circle,

Gangapur Road, Nashik - 422013 Maharashtra. India.

Mon - Fri : 10am - 7pm

​​Saturday :  10am - 4pm

​Sunday: Closed

© 2010-23 Ajay Agrawal and Company 

bottom of page