प्रत्येकाने मेडिक्लेम पॉलिसी पोलिसी , हे शक्य तेवढ्या तरुण वयात लवकरात लवकर काढून घ्यावी. कमी वयात घेतलेली पॉलिसी ला कमी प्रिमियम बसतो आणि कव्हर सुद्धा चांगला मिळतो.
मेडिक्लेम पॉलिसी घेतांना खालील मुद्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे :-
१) सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादा एजन्ट ओळखीचा आहे, नातेवाईक आहे , म्हणून त्याच्याकडूनच मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी हि भावना मनातून काढून टाकावी. तो ओळखीचा असला , नातेवाईक असला म्हणून काही मेडिक्लेम पॉलिसी ची कंपनी त्याच्या xxxx ची होत नाही . कंपनी च्या धोरणाला तो बांधील आहे.
२) काही एजन्ट प्रथम वर्षी ठराविक प्रिमियम ( त्यांच्या कमिशन मधून परत देण्याचे आमिष देतात , त्याला भुलू नये .
३) आपला कौटुंबिक इतिहास, आपल्या सवयी , आपणास असलेली मेडिकल हिस्टरी, आपण करत असलेला धंदा -नोकरी - व्यवसाय ह्या गोष्टी नजरेसमोर ठेवून मेडिक्लेम पॉलिसी चा sum assured ( विमा रक्कम ) ठरवावा. आणि पॉलिसी घेतानाच ती शक्य तेवढ्या जास्त रकमेची घ्यावी .
४) विमा कंपनी तर्फे देण्यात येणाऱ्या - सोयी सुविधा , क्लेम सेटलमेंट प्रोसेस, कंपनी संलग्न हॉस्पिटल्स , कॅशलेस सुविधा, ऍडमिट होण्याच्या आधी आणि नंतरचे क्लेम चे निकष , मेडिकल चेकअप , विमा भरण्याचा कालावधी इत्यादींचा बारकाईने अभ्यास करावा. आणि दुसऱ्या विमा कंपनी शी त्यांची तुलना करून घ्यावी.
५) पॉलिसी मध्ये समाविष्ठ असलेले "co-pay" कलम, नो-क्लेम बोनस, pre existing आजार समावेश, exclusions आणि waiting period आदी बाबी समजून घ्याव्यात.
६) शक्यतो फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्यावा
७) दोन किंवा अधिक विमा कंपनी ची तुलना करतांना विविध निकष लावून बघावे - जसे - कंपनीचा पूर्वइतिहास , त्यांचा या क्षेत्रातील अनुभव , त्यांची आर्थिक गुणवत्ता , त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो आदी.
ह्या सर्व निकषांच्या कसोटीवर जी कंपनी तुम्ही निवडाल , तिची पॉलिसी घेतांना , पॉलिसी फॉर्म भरतांना - आपली माहिती खरीखुरी भरायला विसरू नका. चुकून एखादी बाब कंपनी ला पॉलिसी घेण्याअगोदर कळवण्याचे राहिले तर तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो .
Comments