तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी दोन प्रकारच्या साधनांचा विचार, अभ्यास आणि comparison करून शकता :-
१) स्थावर मालमत्ता
२) शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक ( securities मार्केट -शेयर किंवा म्युच्युअल फंडस् )
आता या दोन्ही पर्यायांचा आपण सखोल तुलनात्मक अभ्यास करू -
१) स्थावर मालमत्ता मधील गुंतवणूक :-
लॉन्ग टर्म गुंतवणूक म्हणून जर तुम्ही प्लॉट मध्ये गुंतवणूक केली तर ती तुम्हाला प्रमाणाबाहेर भाववाढ देऊन जाईल पण त्या प्लॉट वर जर तुम्ही वीट ठेवली ( म्हणजे कोणतेही बांधकाम केले) कि त्या भाववाढीवर आणि भविष्यातील होणाऱ्या नफ्यावर तुम्ही वीट ठेवली असे गृहीत धरायचे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी घर , फ्लॅट , बंगलो , दुकान यापेक्षा बखळ प्लॉट केव्हाही चांगला.
२) शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक :-
शेयर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होणेसाठी एकच मुद्दा लक्षात ठेवावा कि - Rome Was Not Built in a Day .
कोणत्याही गोष्टीचा फायदा होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धीर . शेयर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी धीर ठेवणे या पेक्षा जास्त चांगला, सोपा आणि खात्रीचा मार्ग दुसरा नाही .
शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे आधी तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट्य आणि ते आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ यांची सांगड घालणे अतिशय महत्वाचे आहे .
चला तर मग बघूया कि शेयर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होणेसाठी काय स्टेप्स घ्याव्यात :-
१) तुमच्या मासिक उत्पन्न आणि जीवनावश्यक घरघुती खर्च यांची सांगड घालणे .
२) उरलेल्या पैशातून अगोदर गुंतवणुकीस पैसे वेगळे काढणे आणि गुंतवणूक करणे . आणि पैसे उरल्यास इतर खर्च करणे . अनावश्यक खर्च कपात करणे.
३) आर्थिक उद्दिष्ट्य ठरवणे आणि त्या साठी किती वेळ द्यायची तुमची तयारी आहे हे ठरवणे .
४) गुंतवणूक ची साधने आणि त्याच्या संदर्भातील मूलभूत बाबींची तोंड ओळख करून देणे .
५) गुंतवणूक च्या प्रत्येक साधनांचे फायदे आणि तोटे समजून घेणे
६) आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या आर्थिक घडामोडींचा मागोवा घेणे
७) त्या आर्थिक घडामोडींचा आपल्या गुंतवणुकीवर होणार परिणाम समजून घेणे
८) आपण केलेल्या गुंतवणुकीवर आणि भविष्यातील करणाऱ्या गुंतवणुकीवर ठाम राहणे आणि त्यात नियमित असणे. शिस्तबद्ध गुंतवणूक .
९) मुदतीच्या आधी ही गुंतवणूक काढण्याची वेळ पडल्यास , जास्तीत जास्त गुंतवणूक कशी वाचवता येईल हे बघणे.
शेयर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी आणि आपला पैसे सुरक्षित ठेवण्याकरिता एक जादुई टर्म समजून घेऊयात :- पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ( चक्रवाढीचा फायदा )
शेयर मार्केट मध्ये नियमित गुंतवणुकीतून मिळणारा फायदा हा पुनर्गुंतवणूक होत असतो. गुंतवणूक अधिक फायदा या दोन्हीवर पुन्हा उत्पन्न चालू राहते .
कसे ते बघूया -
समझा तुम्ही XYZ म्युच्युअल फंड च्या ग्रोथ प्लॅन मध्ये १०००० रुपये गुंतवले आणि तुम्हाला त्या फंडाचे १००० युनिट्स मिळाले ( NAV - १० रुपये ) . काही काळानंतर जेव्हा तो फंड डिव्हीडंड देतो ( समजा रुपये १००) , तेव्हा तुम्हाला त्या डिव्हीडंड च्या मोबदल्यात पैसे न मिळता ऍडिशनल युनिट्स मिळतात ( समजा १० युनिट्स ). तर तुमची एकूण गुंतवणूक झाली १,०१० युनिट्स. आणि समजा कालांतराने या म्युच्युअल फंड ची NAV १५ रुपये झाली , तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य होईल - १,०१० युनिट्स X १५ रुपये प्रति युनिट = १५,१५० ( तेच जर तुम्ही डिव्हीडंड प्लॅन घेतला असता तर रोख मिळालेला डिव्हीडंड १०० रुपये आणि मूळ गुंतवणूक १,००० युनिट्स असे एकूण गुंतवणुकीची मूल्य होईल १५,००० रुपये ) म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ( चक्रवाढीचा फायदा ) मुळे झालेला फायदा हा रुपये ५० एवढा असेल [ १५,१५०( ग्रोथ प्लॅन) वजा १५,१०० ( १५,००० मूळ गुंतवणूक + १०० रुपये रोख डिव्हीडंड )]
हे तर झाले म्युच्युअल फंड.
आता बघूया शेयर मार्केट मध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ( चक्रवाढीचा फायदा ) चा कमाल -
सन २००१ साली Eicher Motors ( बुलेट बाईक बनवणारी कंपनी) या कंपनीच्या शेयर ची किंमत होती १७.५० प्रति शेयर आणि एका बुलेट गाडी ची किंमत होती ५५००० रुपये . २००१ मध्ये गाडी घेण्याऐवजी जर कंपनी च्या शेयर मध्ये गुंतवणूक केल्यास ( ५५००० रुपये) ३१४३ शेयर मिळाले असते . आज दिनांक १९ जून २०२० रोजी या शेयर चा भाव होता १७,१९० रुपये प्रति शेयर . म्हणजे ५५००० ची गुंतवणूक २० वर्षात झाली ५.५० करोड रुपये ... तर मित्रांनो ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ( चक्रवाढीचा फायदा ) ची जादू .
तर चला आपण आजच ठरवून घेऊ कि शेयर मार्केट मध्ये यशस्वी होणेसाठी दीर्घ मुदतीची आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करूयात. आणि शेयर मार्केट च्या टिप्स , कॉल्स या प्रलोभनांपासून दूर राहुयात . कारण यशाला शॉर्ट कट नाही ...
कोणत्याही प्राणाची गुंतवणूक करताना लोभ न करता आणि सर्व पर्यायांचा सर्वांगिक विचार करूनच निर्णय घ्या. कारण - "Return OF Investment" is more important than "Return ON Investment"
Comments