आपल्या पैकी किमान ९० % लोकांचे बालपण हे "रोटी कपडा और मकान" हि मनुष्याच्या आयुष्याच्या मूलभूत गरजा हे ऐकण्यात गेले आहे . किंबहुना प्रत्येक मध्यवर्गीय मुलाच्या मनावर हे ठासून बिंबवण्यात आले आहे. परंतु बदलत्या काळानुसार आणि बदलत्या जीवनशैलीनुसार यात जो बदल होणे अपेक्षित होता तो झालेला दिसत नाही. कित्येक वेळा आपल्या संपर्कातील , नात्यातील तसेच आपण स्वतः सुद्धा हेच मानतो कि " एक बंगला बने न्यारा"
मग चालू होते जीवाची दैना .... स्वप्नातले घर घेण्यासाठी बँक कडून कर्ज घ्या , नातेवाईकांकडून हातउसने पैसे घ्या आणि महागातले घर घ्या . आणि त्या कर्जाचा EMI फेडण्याची चिंता लागून जाते. जास्त पगाराची नोकरी करा , पार्टटाइम जॉब करा , काहीतरी उलाढाल करा आणि EMI भरा. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नवरा बायको दोघे कामाला जातात आणि घराला कुलूप लागते . कर्ज काढून घेतलेले महागडे घर फक्त रात्री झोपण्यासाठी उपयोगी पडते . त्या व्यतिरिक्त जास्त त्याचा उपभोग घेतला जात नाही.
त्यामुळे मुळातच गृह कर्ज काढून घेतलेले घर चा उपभोग कधी घ्यावा ? कि फक्त मनोमन समाधान मानावे कि माझे घर एवढे सुंदर आणि मोठे आहे म्हणून . पण त्या साठी केलेल्या त्यागाचा - आर्थिक , मानसिक , शाररिक - चा कोणताच हिशोब केला जात नाही.
त्यामुळे मुळातच गृह कर्ज काढून घर घेणे यात शहाणपण दिसत नाही. त्यापेक्षा , EMI पेक्षा कमी असलेलं दरमहा भाडे परवडते . म्हणजे दर तीन चार वर्षात नवीन घरात रहात येते , नोकरी मुळे दुसऱ्या गावी बदली झाली तरी चिंता नाही , मेन्टेनन्स चा खर्च नाही , बँक वाल्यांचे कर्ज वसुली साठी तगादा नाही.
त्यातल्या त्यात जर गृह कर्ज काढून घर खरेदी केलीच तर , EMI वेळेवर भरावा आणि कर्ज मुदतीच्या आत परत फेड करून NIL करण्याची घाई करू नये ( काही विशिष्ट अपवाद वगळता ) ...
कारणे :-
१) सर्वात स्वस्त व्याज दर : -
गृह कर्ज व्याज दर हा सर्वात स्वस्त दर आहे . गृह कर्ज हे ८ टक्के व्याजाने मिळते , इतर कर्ज हे किमान १०% व्याजाने मिळते . म्हणून जर तुमच्याकडे एक्सट्रा पैसे असतील तर गृह कर्ज मुदतीपूर्वी परत फेड करण्याऐवजी ते तुम्ही दुसरीकडे आवश्यक असलेल्या बाबींसाठी वापरू शकतात.
२) इनकम टॅक्स मध्ये सूट : -
प्रत्येक आर्थिक वर्षात , गृह कर्ज परतफेडीची मुद्दल ( १५०००० रुपये पर्यंत ) आणि आकारण्यात आलेले व्याज ( २००००० पर्यंत ) याची इनकम टॅक्स मध्ये सूट मिळते . जर संपूर्ण कर्ज एकाच वेळेस भरून टाकले तर आगामी वर्षात इनकम टॅक्स मध्ये सूट नाही मिळणार.
३) प्रधानमंत्री आवास योजना ची सूट : -
ठराविक अटींची पूर्तता केल्यास , प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत २,६७,००० पर्यंत चा रीबेट मिळतो . जर ठराविक मुदतीच्या आधी गृह कर्ज परत फेड केली तर हि मिळालेली सूट काढून घेण्यात येऊ शकते.
परंतु , ठराविक पद्धतीने आणि आयकर सल्लागाराच्या मदतीने , तुम्ही व्यवस्थित टॅक्स प्लांनिंग करून , हे कर्ज lumpsum परतफेड न करता, परंतु ठराविक काळात आणि मुदतीपूर्ण परतफेड करू शकता , जेणेकरून EMI च्या जाचातून तुमची लवकरात लवकर सुटका होऊ शकते आणि टॅक्स सेविंग सुद्धा करू शकता.
Comments