कर्ज काढून फायदा होतो कि नुकसान ह्या प्रश्नाचे उत्तर काही ठराविक बाबींवर अवलंबून आहे :-
१) तुम्ही कर्ज कोणते आणि कशासाठी घेत आहेत.
२) कर्ज म्हणून घेतलेल्या रक्कमेचा विनियोग तुम्ही कशा प्रकारे करणार आहात ( End use of funds
३) कर्ज घेतल्यानंतर , ते परतफेड करण्याची आपली क्षमता
४) कर्ज किती कालावधी साठी घेतले जाणार आहे आणि त्या कालावधीतील आपला उत्पन्न स्रोत आणि त्याची टिकून राहण्याची शाश्वती
५) कर्ज कालावधीतील उद्भवणाऱ्या आपल्या इतर काही आर्थिक वचनबद्धता ( Financial Commitments )
फायदा
मागील आठवड्यात , जून २०२० , मध्ये तुम्ही वाचले असेल कि रिलायन्स कंपनी debt free झाली आहे. म्हणजे त्यांच्यावर आता कोणतेही कर्ज नाही. परंतु हि वेळ बघण्यासाठी त्यांना फार वाट बघावी लागली - हजारो कोटी चे कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचा विनियोग त्यांनी उत्तमप्रकारे केला , कर्ज रक्कम धंदा वाढीसाठी वापरली आणि त्यातून स्वतःची प्रगती केली , कंपनीच्या शेयर मूल्य वर्धित झाले , मग एका विशिष्ट मुकाम वर पोहोचल्यानंतर त्यांनी आपली शेयर विकून , कंपनीतला हिस्सा विकून मोठी रक्कम जमा केली ( कंपनीच्या अस्तित्वाला धक्का ना लागू देता ) आणि आज ते debt free झाले. ( जे कागदोपत्री दिसते आहे आणि पेपर्स मध्ये वाचण्यात आले त्यावरून )
पण या सर्वासाठी वर्षानुवर्षे फार मेहनत घ्यावी लागते , तेव्हा जाऊन त्यांना हा दिवस आज पाहता आला.
त्यांच्या बाबतीत आपण म्हणू शकू कि त्यांना कर्ज काढून फायदाच झाला.
आता या च्या विरोधाभास परिस्थिती आपण बघू -
१) निरव मोदी कर्ज ने कर्ज काढतांना काही चुकीच्या कार्यपद्धती अवलंबवल्या , त्यामुळे त्याचे कर्ज बुडीत झाले , त्याला देश सोडून फरार व्हावे लागले , त्याची मालमत्ता विकून सरकार आणि बँक कर्ज वसुली चा प्रयत्न करत
आहे.
२) विजय मल्ल्याने कंपनीच्या नावाने कर्ज घेऊन , ते कर्ज व्यवसायात योग्य रीतीने न वापरता , त्याचा उपभोग घेतला आणि ते कर्ज स्वतःसाठी वापरला आणि आज त्याची परिस्थिती आपण जाणतो.
त्यामुळे, कर्ज काढून फायदा होतो कि नुकसान याचे उत्तर व्यक्तीसापेक्ष बदलू शकते.
Comments