CA Ajay Agrawal

Jul 9, 20201 min

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे :-

तुम्ही सुरु करणार असलेल्या व्यवसायाचे स्वरूप आणि त्याचे स्टेटस ( जसे - पार्टनरशिप , प्रायव्हेट कंपनी , Limited Liability Partnership ( LLP ) ) यावर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील हे अवलंबून आहे .
 

कमी अधिक प्रमाणांत खालील कागदपत्रांपैकी ठराविक कागदपत्रे ( तुमची स्वतःची आणि तुमच्या भागीदाराची - डायरेक्टर) ची लागतात.
 

१) PAN कार्ड , आधार कार्ड , पासपोर्ट ,
 
२) अलीकडील पासपोर्ट फोटोग्राफ
 
३) मोबाईल नंबर , ई-मेल आयडी
 
४) धंद्याच्या जागेचा पुरावा - भाडेकरारनामा , lease अग्रीमेंट , तेथील अलीकडील वीजबिल , घरपट्टी , पाणीपट्टी इत्यादी
 
५) शॉप ऍक्ट लायसेन्स
 
६) GST रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
 
७) पार्टनरशिप असल्यास - पार्टनरशिप डीड
 
८) कंपनी असल्यास - MOA - AOA आणि कंपनी incorporation ची कागदपत्रे , सर्टिफिकेट ऑफ कंमेन्समेंट
 
९) व्यवसायाच्या प्रकारानुसार - ड्रग लायसेन्स , FDA licesne इत्यादी .
 
१०) जर तुम्ही आयात - निर्यात चा धंदा करणार असाल तर IEC चे सर्टिफिकेट
 
११) डॉक्टर किंवा फार्मासिस्ट असाल तर - हॉस्पिटल किंवा मेडिकल साठी - डिग्री सर्टिफिकेट , विशेष परवानगी इत्यादी कागदपत्रे

    30
    0