CA Ajay Agrawal

Jul 9, 20201 min

आयकर परतावा मिळण्यास‌ उशीर झाला असल्यास काय करावे ?

आयकर परतावा मिळण्यास उशीर होण्यामध्ये बरीच कारणे असू शकतात .

त्यामुळे सरळसरळ कोठेही तक्रार करण्याआधी खालील काही बाबी तपासून बघा -

१) आयकर विवरणपत्र भरतांना आपण आपल्या बँक डिटेल्स अचूक भरले आहे.

२) पॅन नंबर आणि आधार नंबर लिंक केले आहे

३) आपण आयकर कायद्याने नमूद केलेल्या ड्यू डेट च्या आत रिटर्न भरले आहे

४) आपला पॅन नंबर आणि बँक तले आपले अकाउंट नंबर ( परतावा मिळण्यासाठी , विवरणपत्रात जो नमूद केला आहे ) दोघे लिंक केले आहेत. अलीकडच्याच काळात आयकर विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार जर आपले पॅन नंबर आणि बँक अकाउंट नंबर लिंक नसेल तर आपणास आयकर परतावा मिळणार नाही.

५) आपले रिटर्न भरल्यानंतर आपण ते EVC द्वारे validate केले आहे.

६) काही वेळेस आयकर विभाग , आपला आयकर परतावा खातरजमा करून घेण्यासाठी , आपणास एक ई-मेल पाठवते . त्या अन्वये तुम्हाला इनकम टॅक्स च्या वेबसाइट लो लॉगिन करून आपला आयकर परतावा कन्फर्म करावा लागतो.

७) मागील वर्षाचे काही टॅक्स जर आपणाकडे देय ( टॅक्स डिमांड ) असतील , तर सदरील आयकर परतावा आयकर विभाग रोखून ठेवते. आणि त्यासंदर्भात आपणास ई-मेल करते . जर ठराविक काळात तुम्ही ती डिमांड मान्य नाही केली किंवा सुधारित रिटर्न नाही भरले किंवा त्याच्या विरोधात तुम्ही अपील नाही केले तर , तुमच्या परताव्यामधून सदरील डिमांड वळती करून , रिफंड उरल्यास तुम्हाला तो अदा केला जातो.

हे सर्व करतांना एक बाब लक्षात घ्या , सर्व साधारणपणे आयकर परतावा मिळण्यासाठी किमान ४ महिन्याचा कालावधी लागू शकतो.

सर्व रिटर्न्स ऑनलाईन भरले जात असल्याने , संपूर्ण भारतातील IT रिटर्न्स बंगलोर च्या IT डिपार्टमेंट मध्ये process होतात. त्यामुळे प्रचंड संख्येत आयकर परताव्याची छाननी करावी लागत असल्याने , काही वेळेस उशीर होऊ शकतो.

    20
    0